निगडी प्राधिकरण परिसरात आगीची घटना; अग्निशमन दलासह पोलिसांची घटनास्थळी धाव

पिंपरी-चिंचवड(प्रतिनिधी:प्रसाद गव्हाणे) दि. २१ नोव्हेंबर २०२६ निगडी प्राधिकरण परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर रोड येथे शनिवार, रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे काम सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनीदेखील घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवले. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांच्या उपस्थितीमुळे घटनास्थळी परिस्थिती हाताळण्यास मदत झाली.
या घटनेमुळे परिसरात काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखविलेली तत्परता महत्त्वपूर्ण ठरली.




