सकल ख्रिस्ती समाज (पिंपरी चिंचवड देहूरोड) तर्फे आ. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात निषेध आंदोलन
सकल ख्रिस्ती समाज (पिंपरी चिंचवड देहूरोड) तर्फे आ. गोपीचंद पडळकर यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा निषेध आंदोलन

दि. १० जुलै २०२५ सायंकाळी ४:०० वाजता, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौक, पिंपरी येथे सकल ख्रिस्ती समाज (पिंपरी चिंचवड देहूरोड) तर्फे जन आक्रोश आंदोलन घेण्यात आले. आमदार गोपीचंद पडळकर यांनी दि. १७ जून २०२५ रोजी सांगली (कुपवाड) येथील मशाल मोर्चामध्ये ख्रिस्ती धर्मगुरूंना उद्देशून अत्यंत चिथावणीखोर वक्तव्याचा बाबत निषेध आंदोलन करण्यात आले. हजारोच्या संख्येने सकल ख्रितीसमाज व इतर समाजातील मान्यवर हजार होते.
त्यावेळी सकल ख्रिस्ती समाज तर्फे खालील मागण्या करण्यात आल्या.
१. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा
२. त्यांच्या आमदार पदाची रद्दबातल कार्यवाही तत्काळ व्हावी.
३. ऋतुजा राजगे आत्महत्या प्रकरणाची CBI व SIT चौकशी व्हावी.
४. समाजात भीती निर्माण करणाऱ्या वक्तव्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.
५. ख्रिस्ती समाजावर धर्मांतर सारख्या होणारे विविध आरोप बंद करावे.
आंदोलनात अनेक मान्यवा रानी हजेरी लावली व अनेक मान्यवरांचे भाषण झाले. त्यात प्रमुख
उपस्थिती श्री.दीपक केदार, ॲड.सर्वजीत बनसोडे, श्री.सीताराम गंगावणे, श्री.मारुती भापकर, श्री.धनाजी येळकर पाटील, मौलाना अब्दुल गफार शेख, ॲड.तौफिक शेख, जनाब तारिक रिजवी, श्री.प्रवीण कदम, जनाब फिरोज मुल्ला, श्री.सतीश काळे, श्री.अनिल भोसले, ब्र.चंद्रकांत उजागरे, पा.शेखर डेव्हिड, पा.बन्यामीन काळे, ब्र.डॅनियल दळवी, ब्र.शिरीष हिवाळे, पा.नितीन काळे, पा.लाझरस सूर्यवंशी, ब्र.जेम्स साळवी, ब्र. स्नेहल डोंगरदिवे
तसेच धार्मिक पुढारी : बिशप प्रदीप चांदेकर, बिशप सॅम्युएल साखरपेकर, बिशप अशोक निकाळजे, बिशप मायकल राज नाडर, बिशप अनिश विजागत, बिशप डॉ.विजय फुर्ताडो, बिशप जॉर्ज घोलप, बिशप डॉ.प्रवीण रणदिवे, बिशप प्रदीप वाघमारे, बिशप मॅथ्यू यनमल, ॲड.विकास वाघमारे आणि अनेक सेवक वर्ग, धार्मिक पुढारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि ख्रिस्ती अनुयायी.
जन आक्रोश आंदोलन समिती: रेव्ह.सॉलोमन भंडारी, ब्र. राजन नायर, ब्र.सुनील उबाळे, रेव्ह.ख्रिस्तोफर रॉड्रिक्स, रेव्ह.विल्सन पाटोळे, ब्र.डेव्हिड काळे, ब्र.नितीन गोर्डे आणि ब्र.फ्रान्सिस गजभीव असे सर्व मान्यवर उपस्थित होते.





