E-Paperटॉप न्यूज़देशमहाराष्ट्रराजनीतिराज्यलोकल न्यूज़

DCP गौहर हसन यांना महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटतर्फे स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे निमंत्रण

पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष हाजी नदीम भाई मुजावर, वरिष्ठ उपाध्यक्ष हाजी खाजा भाई पठाण, सल्लागार महमूद अली सर, कोअर कमिटी सदस्य मुश्ताक भाई, सदस्य झैद भाई तसेच ॲड. रफीक खलील फारुकी यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे उपपोलीस आयुक्त (DCP) मा. गौहर हसन साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन १५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण व सामाजिक कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.

यावेळी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटच्या गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सामाजिक, शैक्षणिक, जनजागृती व जनहिताच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच समाजहित, कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा या विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

मा. गौहर हसन साहेब यांनी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक करत संस्थेच्या गेल्या १८ वर्षांतील समाजोपयोगी व जनजागृतीपर कार्याचे विशेष कौतुक केले. तसेच १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या निमंत्रणाचा स्वीकार करत संस्थेच्या भावी उपक्रमांना आणि कार्याला शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!