E-Paperटॉप न्यूज़देशमहाराष्ट्रराजनीतिराज्यलोकल न्यूज़

गुरुपौर्णिमेनिमित्त उद्योजक चंद्रकांत सरडे यांनी घेतली माजी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांची सदिच्छा भेट

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी: गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड येथील उद्योजक व ‘प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब कटर समर्थक ग्रुप (महाराष्ट्र राज्य)’चे श्री. चंद्रकांत सरडे यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री, भूम-परांडा-वाशी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांची सस्नेह भेट घेतली. सामाजिक व राजकीय क्षेत्रात लोककल्याणाचा ध्यास घेणाऱ्या आणि हजारो कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या सावंत साहेबांचे या पवित्र दिवशी दर्शन घेऊन सरडे यांनी मोलाचे मार्गदर्शन व शुभाशीर्वाद घेतले. या प्रसंगी कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक मा. श्री. गिरिराज सावंत साहेब हे देखील उपस्थित होते.

​या प्रसंगी बोलताना चंद्रकांत सरडे म्हणाले की, “आदरणीय प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांचे दूरदृष्टी नेतृत्व आणि समाजाभिमुख विचार आम्हा सर्वांना जनसेवेच्या व समाजकार्याच्या कार्यात नेहमीच एक नवी ऊर्जा, प्रेरणा आणि अचूक दिशा देतात. त्यांच्या पाठींब्यामुळेच हजारो कार्यकर्त्यांना सामाजिक क्षेत्रात आत्मविश्वासाने काम करण्याचे बळ मिळते.” भेटीच्या शेवटी, आदरणीय सावंत साहेबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समृद्धी लाभो, अशा शब्दांत त्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!