टॉप न्यूज़महाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
“महा विकास समितीचा विजय” देहूरोड कॅन्टोनमेंटने मान्य केल्या मागण्या

दिनांक 15 सप्टेंबर 2025: सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी लढणारी सामाजिक संघटना महा विकास समिती यांच्या मागण्या अखेर मान्य झाल्या आहेत. महा विकास समितीच्या वतीने सोमवार 15 सप्टेंबर 2025 रोजी के. एम. पार्क, शिवाजी विद्यालय येथे आंदोलन करण्याचे नियोजित होते. मात्र, कॅन्टोनमेंट बोर्ड देहूरोड यांनी लोकांच्या सोयीसाठी तात्काळ काम करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रेव्ह सोलोमोनराज भंडारे यांनी सांगितले की “हा फक्त महा विकास समितीचाच नव्हे तर संपूर्ण जनतेचाही विजय आहे. लोकांना होत असलेली गैरसोय लवकरच दूर होईल.




