टॉप न्यूज़देशमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

लोणावळा–खंडाळा घाटात अडकलेल्या प्रवाशांसाठी मराठी मुस्लिम समाज चळवळीचे मदतकार्य

दिनांक ०४/०२/२०२६ रोजी लोणावळा–खंडाळा घाट परिसरात निर्माण झालेल्या तीव्र ट्रॅफिक जाममध्ये तासन्तास अडकलेल्या प्रवाशांसाठी मराठी मुस्लिम समाज चळवळीच्या वतीने तात्काळ मदतकार्य राबवण्यात आले. उकाडा, थकवा आणि पाण्याअभावी त्रस्त झालेल्या हजारो प्रवाशांना अन्न-पाणी, आवश्यक खाण्याच्या वस्तू, पेये आदींचे मोफत वाटप करण्यात आले.
घाटात अडकलेल्या प्रत्येक गरजू प्रवाशांपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत, चळवळीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःहून पुढाकार घेत मानवसेवेचे कर्तव्य पार पाडले.

मानवता आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा हा उपक्रम प्रवाशांसाठी दिलासा देणारा ठरला.
या उपक्रमाच्या माध्यमातून मराठी मुस्लिम समाज चळवळीने समाजसेवेची आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली असून, सामाजिक सद्भाव, मानवता आणि स्वराज्याच्या आदर्शांसाठी चळवळ सातत्याने कार्यरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!