E-Paperटॉप न्यूज़देशराजनीति

तमिळनाडूत राजकीय भूकंप! थलपती विजय आता ‘CM विजय’ ?

तमिळनाडूत सत्ता परिवर्तनाची जोरदार चर्चा दक्षिण सुपरस्टार Vijay आता ‘CM विजय’ बनण्याच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा तमिळनाडूच्या राजकारणात रंगली आहे. Tamilaga Vettri Kazhagam (TVK) ला काँग्रेस, CPI, CPM आणि VCK या पक्षांचा पाठिंबा मिळाल्याने सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे.
आघाडीचे संभाव्य संख्याबळ :
TVK (१०७) + काँग्रेस (५) + CPI (२) + CPM (२) + VCK (२) एकूण : ११८ /२३४
बहुमताचा आकडा गाठल्यानंतर विजय यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधी हे देखील शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहू शकतात.
तमिळनाडूच्या राजकारणात या घडामोडींमुळे मोठा राजकीय भूकंप झाल्याची चर्चा सुरू असून विरोधकांची एकजूट अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!