अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावरील महाचर्चेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावरील महाचर्चेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

पुणे | दि. १८ जुलै २०२६
कामगार सुरक्षा दल, झोपडपट्टी सुरक्षा दल आणि पथारी सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त “मराठी समीक्षकांना अण्णा भाऊंच्या साहित्याचा आवाका पकडता आला का?” या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या महाचर्चा व पुरस्कार वितरण सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. विश्वासराव पाटील, प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक मा. श्री. प्रविण तरडे, माणुसकीची पंचवटीचे संस्थापक मा. श्री. राज देशमुख, ज्येष्ठ पत्रकार मा. श्री. अरुण खोरे, मा. प्रा. डॉ. सुनील मंडगे, ज्येष्ठ विचारवंत मा. प्रा. अस्मा शेख तसेच झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. भगवानराव वैराट यांनी उपस्थित राहून अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य, विचार आणि सामाजिक कार्याचा विविध पैलूंनी सखोल आढावा घेतला.



राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष पुणे शहर सौ. गुलशन शेख,झोपडपट्टी सुरक्षा दल पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मोहम्मद भाई शेख ,महिला शहराध्यक्ष पुणे MIM सौ. सुमैया पठाण, समाजसेविका शबाना खान, समाजसेवक पत्रकार अल्ताफ शेख, समाजसेविका किरण शेख, डॉ. अफरोज, गणेश भाऊ ,इमरान शेख यांची विशेष उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ वंचित, श्रमिक आणि सर्वसामान्य समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नसून सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारे असल्याचे सांगितले. त्यांच्या साहित्याचा व्यापक आशय आणि समाजमनावर झालेला प्रभाव अधिक प्रभावीपणे अभ्यासला जाण्याची आवश्यकता असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी समाज, साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी कार्यक्रमाचे आणि चर्चेतील वैचारिक मांडणीचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कामगार सुरक्षा दल, झोपडपट्टी सुरक्षा दल आणि पथारी सुरक्षा दल यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले. उपस्थित मान्यवर, साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाला यशस्वी स्वरूप प्राप्त करून दिले.




