क्राइमटॉप न्यूज़देश

गुजरात मधील एका आश्रमातून बनावट नोटांचा रॅकेट उध्वस्त

आश्रमातून बनावट नोटांचा रॅकेट उध्वस्त; ₹२ कोटींच्या नोटा जप्त, ६ जण अटकेत

गुजरात पोलिसांनी बनावट नोटांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत अहमदाबाद क्राइम ब्रांचला मोठे यश मिळाले आहे. सूरत येथे कार्यरत असलेले बनावट नोटांचे मोठे रॅकेट उध्वस्त करण्यात आले असून, या कारवाईत सुमारे ₹२ कोटींहून अधिक किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी एका महिलेसह एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. क्राइम ब्रांचला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. सूरत येथून अहमदाबादकडे बनावट नोटांची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. आरोपींकडून ₹५०० मूल्याच्या ४०,००० हून अधिक बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!