टॉप न्यूज़देशमहाराष्ट्रलोकल न्यूज़

मराठा-मुस्लिम समाज चळवळच्यावतीने हाडशी गावात एकतेचा संदेश

हाडशी गावात मराठा-मुस्लिम समाज चळवळच्या वतीने एकतेचा संदेशदेत शिरखुर्मा वाटप व गरजूंना मदतीचा हात

पिंपरी-चिंचवड तालुक्यातील हाडशी गावात मराठा-मुस्लिम समाज चळवळच्या वतीने सामाजिक एकतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने विशेष उपक्रम राबविण्यात आला. यावेळी गावातील सर्व नागरिकांसोबत शिरखुर्मा बनवून त्याचे वाटप करण्यात आले.

तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना कपडे वितरित करण्यात आले. यासोबतच अपंग व्यक्तींना कपडे तसेच हँडीकॅप चेअर देऊन मदतीचा हात पुढे करण्यात आला.

या कार्यक्रमाला मराठा-मुस्लिम समाज चळवळचे हाफिज मोईन शेख, अब्बास शेख, कमरुनीसा शेख व इतर सहकारी उपस्थित होते. तसेच हाडशी गावाच्या सरपंच सौ. अनिता ताई आणि माजी सरपंच यांनीही या उपक्रमाला मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!