E-Paperhttps://mvsnews.info/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifटॉप न्यूज़महाराष्ट्रयुवाराजनीतिराज्यलोकल न्यूज़

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (SP) कडून मिठाई वाटप; महाविकास आघाडीच्या विजयाचा जल्लोष!

पिंपरी-चिंचवड : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार) यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी पक्षाचे युवा अध्यक्ष इम्रानभाई शेख, मा शहर अध्यक्ष तुषारभाऊ कामठे, मा नगरसेविका सुलक्षणाताई शिलावन्त, महिला अध्यक्ष ज्योतीताई निंबाडकर, प्रदेश सचिव अल्पसंख्यांक कमरुनिसा शेख, संदीप भाऊ चव्हाण, योगेश सावंत, राजिकांत गायकवाड, मोहसीन भाई अशी अनेक मान्यवर व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांना मिठाई वाटून विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन केले. महाविकास आघाडीच्या या विजयाबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

“लोकशाहीच्या या विजयाबद्दल महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन!” असा संदेश यावेळी देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!