महाराष्ट्रयुवाराजनीतिलोकल न्यूज़

युवराज कोकाटे यांचा शेकडो समर्थकांसह एकनाथ शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश

युवराज कोकाटे यांचा शेकडो समर्थकांसह एकनाथ शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश

पुणे | दि. १५ जुलै २०२६

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि माजी आरोग्यमंत्री तथा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या लोकाभिमुख नेतृत्वावर व विकासकामांवर विश्वास व्यक्त करत, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर संघटक मा. श्री. युवराज सूर्यभान कोकाटे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

या पक्षप्रवेशासाठी उद्योजक श्री. चंद्रकांत सरडे यांनी महत्त्वाची समन्वयकाची भूमिका बजावली. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली २०१९ पासून सातत्याने केलेल्या संघटनात्मक कार्याचा हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

या प्रवेशामुळे कामधंदा, रोजगार, शिक्षण व उद्योगधंद्याच्या निमित्ताने पुण्यात वास्तव्यास असलेल्या भूम-परंडा-वाशी तालुक्यातील नागरिक, तरुण आणि नोकरदार वर्गाला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार असून, रहिवासी संघाच्या माध्यमातून त्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीला अधिक बळ मिळणार आहे.

यावेळी आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांनी युवराज कोकाटे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे शिवसेना पक्षात मनःपूर्वक स्वागत केले. तसेच त्यांच्या भावी सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देताना, “येणाऱ्या काळात कोणतीही अडचण आली तरी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. विकासकामांसाठी कोणतीही कमतरता भासू देणार नाही,” अशी ग्वाही दिली.

या प्रसंगी अजय कोकाटे, कुश कोकाटे, लवराजे कोकाटे, राहुल गटकळ, सागर देवरे, समीर मुल्ला, ऋषिकेश कावळे, अनिल रोडगे, सुभाष झिरपे, भारत गटकळ, नामदेव तांबिले, सुजाता गजरमल, रामराजे सावंत, कल्याण कोकाटे, जनाबाई गोरे, वंदना बनसोडे, महादेव कोकाटे, महादेव जाधव, सचिन पाटील, हनुमंत हुके, तेजस चौधरी, अमोल शिंदे, नाना शिंदे, संतोष कोळी, विनोद मोरे, समीर घेमरूड, ठनू कोकाटे, दादा थिटे, नितीन जगताप, चंद्रकांत जाधव, आबा पांचाळ, पप्पू वायशे, अशोक आवारे, नारायण भांडवलकर, महेश भांडवलकर, अनिल कोकाटे, बाळासाहेब गणगे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

याप्रसंगी उद्योजक श्री. चंद्रकांत सरडे, उद्योजक श्री. राजाभाऊ शेळके, जांब गावचे सरपंच समाधान भोरे, दीपक गटकळ, राजाभाऊ कोळी तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!