टॉप न्यूज़महाराष्ट्रराजनीतिराज्यलोकल न्यूज़

पिंपरीच्या शगुन चौकात भीषण आग; दोन दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान होण्याची शक्यता!

पिंपरीच्या शगुन चौकात भीषण आग; दोन दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान होण्याची शक्यता!

पिंपरीच्या शगुन चौकात भीषण आग; दोन दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान होण्याची शक्यता!

पिंपरी : पिंपरी येथील शगुन चौक परिसरात शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून दुकानांमधील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आगीची तीव्रता इतकी होती की दुकानांचे शटर, आतील साहित्य तसेच इमारतीच्या काही भागाला आगीची झळ बसली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीचे नेमके कारण, आर्थिक नुकसानीचा आकडा आणि जीवितहानी झाली आहे किंवा नाही, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विद्युत उपकरणे व वायरिंगची नियमित तपासणी करणे किती आवश्यक आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!