जमीयत उलेमा-ए-हिंद (मौलाना महमूद मदनी गट) ची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

पिंपरी चिंचवड : आज कुदळवाडी, जाधववाडी आणि चिखली येथील मशिदींसह धार्मिक स्थळांवरील अतिक्रमणाच्या कारवाई संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस जमीयत उलेमा-ए-हिंद, पुणे जिल्हाध्यक्ष मा. मुफ्ती शाहीद साहेब, ॲक्शन कमिटी महाराष्ट्रचे अध्यक्ष मा. मोहम्मद जाहिद साहेब, मराठी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाफिज मोईनोद्दीन शेख साहेब तसेच त्यांच्या सहकाऱ्यांची उपस्थिती होती.
बैठकीमध्ये सध्याची परिस्थिती आणि काळाची गरज लक्षात घेऊन सर्व समाजघटक, संघटना आणि न्यायप्रिय नागरिकांना एकत्र घेऊन या विषयावर एकसंघपणे लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. धार्मिक स्थळांच्या संरक्षणासाठी आणि नागरिकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकशाही व कायदेशीर मार्गाने आपली भूमिका ठामपणे मांडण्यावर सर्वांनी एकमत व्यक्त केले.
याच अनुषंगाने दि. १२ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनास सर्व संघटना व समाजघटकांनी पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
धार्मिक स्थळांचे संरक्षण, न्याय आणि संविधानिक हक्कांच्या रक्षणासाठी समाजातील सर्व घटकांनी एकजुटीने व शांततापूर्ण मार्गाने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.




