E-Paperhttps://mvsnews.info/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifटॉप न्यूज़दुनियादेशयुवाराजनीति

शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत राष्ट्रपतींकडे न्यायासाठी धाव

सोनम वांगचुक यांना वाचवा, न्याय द्या! — राष्ट्रपतींकडे महा विकास समितीचे निवेदन

नवी दिल्ली | प्रतिनिधी : महा विकास समितीचे संस्थापक व अध्यक्ष तसेच राष्ट्रीय माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते रेव्ह. डॉ. सोलोमोनराज भंडारे यांनी भारताच्या राष्ट्रपतींकडे शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणासंदर्भात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनात, सोनम वांगचुक यांनी देशातील विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नांसाठी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाची गंभीर दखल घेण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत, संबंधित यंत्रणांनी त्यांच्या मागण्यांवर संवाद साधावा आणि आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या शांततापूर्ण आंदोलनाकडे दुर्लक्ष होणे लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनक आहे. राष्ट्रपतींनी स्वतः या प्रकरणात हस्तक्षेप करून त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करावी व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे देशभरात विविध स्तरांतून चिंता व्यक्त केली जात असून, त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय देखरेख ठेवण्याबाबत न्यायालयानेही प्रशासनाला आवश्यकतेनुसार हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!