E-Paperक्राइमदुनियादेशयूपीलोकल न्यूज़

नाझिया इलाही खान यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी; कोंढवा पोलीस ठाण्यात संयुक्त तक्रार

नाझिया इलाही खान यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी; कोंढवा पोलीस ठाण्यात संयुक्त तक्रार

पुणे, दि. २४ जून २०२६ : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नाझिया इलाही खान (उर्फ “नाझिया सनातनी”) यांनी पैगंबर मुहम्मद (स.) आणि उम्मतच्या माता हजरत आयेशा सिद्दीका (र.) यांच्याविषयी कथितरित्या अपमानास्पद, चिथावणीखोर आणि धार्मिक भावना दुखावणारी विधाने केल्याच्या आरोपावरून कोंढवा परिसरातील मुस्लिम समाजाच्या वतीने कोंढवा पोलीस ठाण्यात संयुक्त तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, १९ जून २०२६ रोजी इंस्टाग्रामवरील एका पॉडकास्ट/व्हिडिओ कार्यक्रमात नाझिया इलाही खान यांनी इस्लाम धर्मातील अत्यंत पूजनीय व्यक्तींविषयी आक्षेपार्ह आणि अनादरपूर्ण टिप्पणी केली. सदर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याने कोंढवा परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदारांच्या मते, अशा प्रकारची विधाने विविध धार्मिक समुदायांमध्ये वैमनस्य निर्माण करून सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचवू शकतात. त्यामुळे संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम १९६, २९९ आणि ३५३ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच संबंधित सोशल मीडिया दुवे व इलेक्ट्रॉनिक पुरावे सुरक्षित करून त्यांचा तपास करण्यात यावा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आरोपीविरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी ज्येष्ठ समाजसेविका शबाना खान, ॲड हैदर अली शेख,ॲड. तहा जागीरदार, ॲड मूफिज शेख,ॲड अफवान सय्यद,पत्रकार अल्ताफ शेख, मानवाधिकार कार्यकर्ते शोहब शेख, पत्रकार अकिल शेख तसेच मुस्लिम समाजातील विविध पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!