E-Paperटॉप न्यूज़महाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
पत्रकारितेतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव कमरुनिसा शेख यांना Griffin Award प्रदान
MVS News चा अभिमान! कमरुनिसा शेख यांना पुण्यात Griffin Award.

पुणे: दि. १९ एप्रिल २०२६ रोजी Journalists Griffin Awards सोहळा पुण्यात उत्साहात पार पडला. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध पत्रकारांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
यावेळी MVS News च्या संपादिका कमरुनिसा शेख यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना Griffin Award प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे समाजातील विविध महत्त्वाच्या विषयांना प्रभावीपणे वाचा मिळाल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
हा कार्यक्रम S. M. Joshi Socialist Foundation, Pune येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अली भोजानी आणि नवनीत सिंग गांधी यांनी विशेष पुढाकार घेतला.





