E-Paperhttps://mvsnews.info/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifटॉप न्यूज़महाराष्ट्रराजनीतिराज्यलोकल न्यूज़

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी लवकरच जनता दरबार: सुप्रिया सुळे

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी लवकरच जनता दरबार घेणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी हिंजवडीसह पिंपरी-चिंचवड शहरातील तसेच राज्यातील रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची टीका त्यांनी केली.

त्या म्हणाल्या की, हिंजवडी आयटी पार्कमुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. मात्र, सरकारच्या दुर्लक्षामुळे या गुंतवणुकीचे नुकसान होत आहे. हिंजवडीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याबाबत सरकार आणि स्थानिक प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा.

या बैठकीला शहराध्यक्ष तुषार कामठे, सुनील गव्हाणे, विशाल वाकडकर, इम्रान शेख, ज्योती निंबाळकर, सुलक्षणा शिलावंत, जयंत शिंदे, देवेंद्र तायडे, कमरुनिसा शेख, जाविदमिया जहागिरदार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!